महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pune Minor Girl Rape : पुण्यात ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयातच लैंगिक अत्याचार - मुलीवर गर्ल्स हायस्कूलच्या शौचालयातच लैंगिक अत्याचार

पुण्यातील शिवाजीनगर परिसरात एका गर्ल्स हायस्कूलमध्ये ११ वर्षाच्या मुलीवर शाळेच्या ( 11 years girl assaulted in school ) शौचालयातच लैंगिक अत्याचार झाल्याची ( Pune Minor Girl Rape ) धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Minor Girl Rape
पुण्यात ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By

Published : Mar 24, 2022, 11:47 AM IST

Updated : Mar 24, 2022, 6:50 PM IST

पुणे -पुण्यातील शिवाजीनगर परिसरात एका गर्ल्स हायस्कूलमध्ये ११ वर्षाच्या मुलीवर शाळेच्या ( 11 years girl assaulted in school ) शौचालयातच लैंगिक अत्याचार झाल्याची ( Pune Minor Girl Rape ) धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून बुधवारी सकाळी 11 वाजता हा सारा प्रकार घडला आहे.

प्रतिक्रिया

काय आहे नेमकं प्रकरण ?याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ११ वर्षाची असून ती जंगली महाराज रस्त्यावरील एका नामांकित शाळेत शिक्षण घेते. बुधवारी ती पीडित मुलगी रोजच्याप्रमाणे शाळेत आली होती. एका अज्ञात व्यक्तीने त्या मुलीसोबत ओळख असल्याचा बहाणा करत आणि तिच्यासोबत भांडण करत केले. तिला जबरदस्तीने ढकलत शाळेतील बाथरूममध्ये नेले. तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर या विषयी कुणाला बाहेर काही सांगितल्यास बघ अशी धमकी दिली.

शिवाजी नगर पोलिस स्टेशन

गुन्हा दाखल - दरम्यान, त्या पीडित मुलीने शाळेत घडलेला सगळा प्रकार घरी गेल्यावर आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने लगेचच पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

हेही वाचा -VIDEO: प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरने शिपायाला केली अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Last Updated : Mar 24, 2022, 6:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details