महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासादायक! पुणे विभागातील 11 हजार 528 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले - pune division corona updates

आजपर्यंत पुणे विभागामध्ये एकुण 1 लाख 33 हजार 282 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 30 हजार 995 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 287 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 12 हजार 162 नमुन्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असून 18 हजार 532 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

CORONA FREE PATIENT
कोरोनामुक्त रुग्ण

By

Published : Jun 20, 2020, 8:06 PM IST

पुणे - राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिसव वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. रुग्णांची वाढ होत असल्यामुळे सरकारही चिंतेत आहेत. यातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे विभागातील म्हणजेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात रुग्ण कोरोनामुक्त झाले 11 हजार 528 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

हेही वाचा...लॉकडाऊनचा फायदा घेत 'त्याने' कमाविले 49 लाख, आरोपी अटकेत

पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता एकूण 18 हजार 532 झाली आहे. तर विभागात एकूण 6 हजार 213 ॲक्टिव रुग्ण आहे. विभागात आतापर्यंत एकुण 791 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 340 रुग्ण गंभीर असून उर्वरीत रुग्ण निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.21 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 4.27 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील 14 हजार 725 कोरोनाबाधित रुग्ण असून यापैकी 9 हजार 2 कोरोनाबाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णसंख्या 5 हजार 159 आहे. तर आतापर्यंत एकूण 564 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 320 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.13 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.83 टक्के इतके आहे.

शुक्रवारी समोर आलेल्या आकडेवारीत कोरोना विषाणूने बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागातील बाधित रुग्ण संख्येमध्ये एकूण 603 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 477, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 100, सांगली जिल्ह्यात 5 तर कोल्हापूर जिल्ह्यात 02 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

हेही वाचा...दहशतवादी तहव्वूर राणाला पुन्हा अटक होणे, भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे - उज्ज्वल निकम

सातारा जिल्ह्यात एकूण 800 रुग्ण कोरोनाबाधित असून 613 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव रुग्ण संख्या 148 आहे. तर आतापर्यंत एकूण 39 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 5 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 79 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर ॲक्टिव रुग्ण ख्या 754 आहे. तसेच एकूण 172 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 271 कोरोनाबाधित रुग्ण असून 160 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णसंख्या 103 आहे. एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 731 कोरोनाबाधित रुग्ण असून 674 रुग्ण कोरोनातून बरे होवून घरी गेले आहेत. जिल्ह्यात ॲक्टिव रुग्णांची संख्या 49 आहे. तर आतापर्यंत एकूण 8 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पुणे विभागामध्ये एकुण 1 लाख 33 हजार 282 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 1 लाख 30 हजार 995 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 2 हजार 287 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 12 हजार 162 नमुन्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह असून 18 हजार 532 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details