पुणे -जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुगे पडवळ येथील बेंदवस्ती येथे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या अनिल चांगदेव चासकर यांच्या गोठ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ५ शेळ्या ६ लहान बकऱ्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात चासकर यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले.
बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या मेढ्यांचा मृत्यू, नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत वाढली
जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ येथील बेंदरवस्ती येथे बिबट्याने चासकर यांच्या गोठ्यावर केलेल्या हल्ल्यात ११ शेळ्या व मेढ्यांचा मृत्यू झाला. या चासकर यांचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले.
बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या मेढ्यांचा मृत्यू
चासकर हे शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेळ्या, मेंढ्या पालन करतात, त्यांच्या गोठ्यात 50 शेळ्या होत्या. गोठ्यावर बिबट्याने अचानक हल्ला करुन ११ शेळ्या बकऱ्यांना ठार केले. या घटनेनंतर दुपारच्या सुमारास वनविभागाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.