पुणे31 ऑगस्टला देशभरात गणेश चतुर्थी Ganesh Chaturthi 2022 साजरी होत आहे. गणरायाचे आगमन होत आहे.तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव Ganeshotsav 2022 हा पुण्यात मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो. सार्वजनिक गणपती मंडळाचा गणपती उंचच्या उंच मूर्तीसाठी ओळखला जातो. तुळशीबाग या खरेदीच्या ठिकाणी मध्यभागी याची स्थापना होते. दक्षित तुळशीबागवाले यांनी 1900 साली या गणेशोत्सवाची सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची Tulshibagh Ganapati मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करायचे आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हे काम करतो.
मंडळाला 122 वर्षे पूर्णतुळशीबाग गणेश मंडळातर्फे यावर्षी सुद्धा मोठी तयारी करण्यात आलेली असून, मंडळाला 122 वर्षे झालेली आहेत या ठिकाणी गणपतीला भव्य मंडप उभारला Ganesh Chaturthi आहे. सभामंडपामध्ये श्री गणेशाचे स्वानंद पुरम असे दृश्य असणार आहे. यावर्षी मंडळामध्ये मोठा उत्साह असल्याचे या मंडळाचे पदाधिकारी यांनी सांगितले आहे.