पुणे- माळेगाव साखर कारखान्यातील (ता. बारामती) अपघातात गंभीर असलेल्या कामगाराचा मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. शिवाजी भोसले असे मृत कामगाराचे नाव आहे. माळेगाव साखर कारखान्यातील अपघातामध्ये १२ कामगार बेशुद्ध पडले होते.
पुणे येथे उपचार घेत असलेले कामगार घनश्याम निंबाळकर यांची प्रकृतीदेखील चिंताजनक असल्याची माहिती माळेगाव कारखाना प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा-पुणे शहरात शुक्रवारी २०५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
माळेगाव साखर कारखान्यातील व्हॅक्युअम क्लिसलेझरचे काम सुरू असताना त्यात शनिवारी वायू तयार झाला. या हानीकारक वायूमुळे १२ कामगार बेशुद्ध पडले होते. बेशुद्ध कामगारांना तत्काळ बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी १० जण शुद्धीवर आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर दोघांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले होते.
हेही वाचा-पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवसात ४६ कोरोनाबाधितांची नोंद, आजपर्यंतची उच्चांकी रुग्संणख्या