पणजी - नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मलंग' चित्रपटात गोव्याची बदनामी करण्यात आल्याचे कानावर आले. त्यामुळे यापुढे गोवा मनोरंजन संस्थेच्या माध्यमातून चित्रपट छायाचित्रणाचा परवानगी देताना त्याचे कथानक आणि गोव्यावर नेमके काय चित्रित केले जाणार आहे; हे जाणूनच परवानगी दिली जाईल, असे मत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
जंगल सफारीसाठी बनवण्यात आलेल्या मोटारसायकलींना मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी दाखवला हिरवा झेंडा... आल्तिनो (पणजी) येथे वनविभागाने उभारलेल्या 'वनभवन' इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जंगलामध्ये घसरत घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मोटारसायकलींना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. या इमारतीच्या आवश्यक गरजेपैकी 30 टक्के वीज ही त्यावर उभारलेल्या सोलर पॅनलमधून निर्माण केली जाणार आहे. या कार्यक्रमाला पणजीचे महापौर उदय मडकईकर, गोवा साधन सुविधा महामंडळाचे अध्यक्ष आमदार जोशूआ डिसोझा, मुख्य सचिव परिमल राय, वनाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा...खुशखबर! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता पाच दिवसांचा आठवडा
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यातील वाघांच्या मृत्युच्या घटनेचा अहवाल अद्याप सरकारकडे आलेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाईची दिशा ठरवली जाईल. गोव्याचा 30 टक्के भाग वनाच्छादित आहे. ही बाब अभिमानाची आहे. आम्ही वाघांची काळजी घेणार आहोत पण येथे असलेल्या गावांचाही विचार करावा लागणार आहे.
गोवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोव्यातील जिल्हापंचायत निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होऊनही सविस्तर कार्यक्रम जाहीर का झाला नाही ? याबाबत सावंत यांना विचारण्यात आले. त्यावेळी डॉ. सावंत म्हणाले की, 15 मार्च रोजी जिल्हा पंचायत निवडणूक घेण्याची अधिसूचना जारी करण्यात आली होती. परंतु 9 ते 15 फेब्रुवारी हा शिमगोत्सव काळ आहे. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलता येणे शक्य आहे का ? याची राज्य निवडणूक आयोगाला विचारणा करण्यात आली होती. या सर्व बाबींचा विचार करत निवडणूक आठवडाभर पुढे ढकलून 22 मार्चला होणार आहे.
हेही वाचा..अनुराधा पाटील यांना यंदाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार जाहीर