पणजी -गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडली होते. तर गोवा विधानसभा निवडणुकीचे ( Goa Election Result 2022 ) 10 मार्च रोजी निकाल हाती आले होती. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे वाळपई मतदारसंघातून आणि त्यांच्या पत्नी दिव्या राणे या पर्यें मतदारसंघातून विजयी ( Vishwajeet and his wife Divya Rane won ) हे झाल्या. आज गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांनी शपथ घेतली तर विश्वजीत राणे मंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनी मागील विधीमंडळात आरोग्यमंत्री म्हणून कोविड काळात चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे यावेळी त्यांच्याकडे आरोग्य खाते दिल्या जाते की दुसरे कोणते खाते दिल्या जाते हे पाहणे उत्त्सुकतेचे राहणार आहे.
उडाळी होती खळबळ -विश्वजीत राणे यांनी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची सदिच्छा भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. विश्वजित राणे हे मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक होते. राणे आणि प्रमोद सावंत यांच्यात बरेच दिवसांपासून शीतयुद्ध सुरुही होते. त्यामुळे भाजपाची अंतर्गत राजकिय बंडाळी चव्हाट्यावर आली होती. केंद्रीय निरिक्षक गोव्यात याल्याच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत बंडाळी समोर आल्याने भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
विश्वजीत राणे यांच्याबद्दल - उत्तर गोव्यात मोडणाऱ्या सत्तरी तालुक्यातील वाळपई मतदार संघाचे विश्वजीत राणे प्रतिनिधीत्व करतात. उत्तर गोव्यातील वाळपई विधानसभा मतदार संघावर त्यांची पकड कायम आहे. राणे हे 2017 ला काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. मात्र अवघ्या महिनाभरात त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन आपल्या सत्तरी युवा मोर्चा तर्फे अपक्ष निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पून्हा विजय झाला व पुढे ते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री झाले होते.