पणजी- रुग्णाला त्याच्या गरजेनुसार आणि जागतिक दर्जाचा पोषण आहार देण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न असून यासाठी 'सोडेक्स' कंपनीच्या सहकार्याने त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजीत राणे आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.
गोवा सरकार रुग्णांना जागतिक दर्जाचे अन्न देणार - आरोग्य मंत्री विश्वजीत राणे - patient
राणे म्हणाले, गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या रुग्णाला जागतिक दर्जाचे अन्न देण्यासाठी गोवा सरकार कटीबद्ध आहे. यासाठी 'सोडेक्स' या कंपनीला व्यवस्थापनाचा ठेका देण्यात आला आहे. गोवा सरकार यासाठी दरवर्षी १६ कोटी रुपये खर्च करणार आहे.
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात रुग्णाला त्याच्या गरजेनुसार पोषण आहार देण्याच्या योजनेचा शुभारंभ मंत्री राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आला. यावेळी राणे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांना जेवण दिले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री राणे म्हणाले, गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या रुग्णाला जागतिक दर्जाचे अन्न देण्यासाठी गोवा सरकार कटीबद्ध आहे. यासाठी 'सोडेक्स' या कंपनीला व्यवस्थापनाचा ठेका देण्यात आला आहे. तसेच याची तपासणी करण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. जी कधीही अन्नाची तपासणी करू शकते.
गोवा सरकार यासाठी दरवर्षी १६ कोटी रुपये खर्च करणार आहे. दरदिवशी गोमेकॉत १० ते ११ हजार लोक येत असतात. यासाठी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. येथील अन्नपदार्थांच्या किंमतीही निश्चित करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारची योजना येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही राबवली जाणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दरदिवशी सुमारे १ हजार ५०० रुग्णांना अशाप्रकारे सध्या जेवण दिले जाणार आहे. यावेळी आरोग्यमंत्री राणे आणि उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यावेळी जेवणाचा आस्वाद घेतला.