महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुख्यमंत्र्यांच्या आरोग्याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत - विनय तेंडुलकर - false

मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या तब्येतीबाबतीतही अशाच अफवा पसरवल्या जात आहेत. आजच्या बैठकीत नेतृत्व बदलाची कोणतीही चर्चा झालेली नाही. पर्रिकर यांची प्रकृती स्थीर असून ते आपल्या घरी आराम करत आहेत, असे विनय तेंडुलकर म्हणाले.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर

By

Published : Mar 17, 2019, 5:17 PM IST

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेल्या वर्षभरापासून आजारी आहेत. अलिकडे ३ महिन्यांपासून त्यांच्या तब्येतीविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. तब्येत अधूनमधून कमी-जास्त होत असली तरीही आजच्या बैठकीत नेतृत्व बदलाची काहीच चर्चा झालेली नाही, अशी माहिती गोवा प्रदेश भाजपाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली.

पणजीतील भाजप कार्यालयात भाजपच्या निवडणूक समितीची बैठक आज सकाळी आयोजित करण्यात आली होती. यासाठी तेंडुलकर यांच्यासह सभापती डॉ. प्रमोद सावंत, दामोदर नाईक, महिला मोर्चा अध्यक्ष सुलक्षणा सावंत, कुंदा चोडणकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर तेंडुलकर म्हणाले, आजची बैठक ही लोकसभेचे २ आणि राज्य विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीचे ३ उमेदवार ठरविण्यासाठी होती. लोकसभेसाठी विद्यामान खासदारांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले आहे. यासाठी उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यातून नरेंद्र सावईकर उमेदवार असतील. विधासभेच्या मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघासाठी त्या मतदारसंघातून निवडून येत राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेल्यांना उमेदवारी दिली जाईल. तर म्हापसा मतदारसंघातील उमेवारासाठी चर्चा सुरू आहे. आजच ठरविलेली ५ नावे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीला ईमेलद्वारे पाठविली जातील. कारण आम्ही आजच्या बैठकीला पोहचू शकलो नाही.

काँग्रेस आमदार तथा माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी दिल्लीला गेल्याची चर्चा होत आहे. याविषयी बोलताना विनय तेंडुलकर म्हणाले, अफवा या अफवाच असतात. कोणीतरी आपल्या कामासाठी दिल्लीला गेले म्हणजे ते भाजप प्रवेश करणार आहेत असे नाही. जर तसे असते तर स्थानिक नेतृत्व म्हणून आम्हाला कळाले असते.

ABOUT THE AUTHOR

...view details