पणजी - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू बुधवारी दुपारी गोव्यात दाखल झाले. राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपराष्ट्रपतीेचे स्वागत केले. त्यांनतर ते पणजीतील राजभवन येथे दाखल झाले. सुरक्षेच्या कारणांस्तव त्यांचे वास्तव्य राजभवन येथेच आहे.
पेडणे येथे शासकीय महाविद्यालयाचे उद्घाटन-
उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता उत्तर गोव्यातील पेडणे येथील शासकीय कार्यक्रमात सहभागी होतील. यावेळी ते पेडण्यातील संत सोहिरोबनाथ शासकीय महाविद्यालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. त्यांच्यासोबत राज्यपाल इ श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत सहभागी होणार आहेत.
ममता बॅनर्जी आणि राहुल गांधीचा शुक्रवारपासून गोवा दौरा -