पणजी -उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी शुक्रवारी गोवा राजभवन (Goa Raj bhawan) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या 700 आसन क्षमतेच्या नव्या राजदरबार हॉलचे उद्घाटन (inaugurates New Darbar Hall) केले आहे. आगामी विधानसभा निवडणूक निकाल आणि शपथविधी सोहळा लक्षात घेऊन हा उद्घाटन सोहळा महत्वाचा मानला जात आहे. येत्या दहा मार्चला गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
ही आहेत या दरबार हॉलची वैशिष्ट्ये-
एकूण 18 करोड खर्च करून हा नवीन हॉल बांधण्यात आला
एकाचवेळी 600 ते 700 जणांची आसनव्यवस्था
पारदर्शक भिंती आणि रुंद व्हरांड्यासह ही इमारत गोव्याच्या वास्तुकलेचे प्रतिबिंब