पणजी - शुक्रवार हा मुस्लिम धर्मीयांचा पवित्र वार आहे. या दिवशी ते मशिदीत जाऊन नमाज अदा करतात. नेमका याच दिवशी या बाह्यशक्तींच्या सांगण्यावरून नमाजानंतर हिंसाचाराचे कृत्य करणे दुर्दैवी असल्याचे मत केंद्रीय कायदा राज्यमंत्री एस पी सिंग बघेल (S. P. Singh Baghel) यांनी व्यक्त केले आहे.
दोषींवर कारवाई करणार - हिंसाचारात सहभागी असणाऱ्या व बाह्यशक्तींच्या सांगण्यावरून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर संविधानाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकारे कोणतीही गोष्ट यापुढे देशात खपवून घेतली जाणार नसल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले.