पणजी - केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक मागील १० दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज मात्र त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना दिल्लीला हलविण्याचा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
आयुष मंत्री श्रीपाद नाईकांची प्रकृती खालावली - मुख्यमंत्री प्रमोद सावंत - प्रमोद सावंत बातमी
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रकृती खालावली असून या संदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली आहे.
श्रीपाद नाईक
मागील १० दिवसांपासून मणिपाल रुग्णालयात श्रीपाद नाईकांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज सकाळी त्यांच्या शरीरातील ऑक्सीजन साठा कमी झाला आहे. यानंतर दिल्ली एम्समधील डॉक्टरांचे एक पथक गोव्यासाठी रवाना झाले आहे. नाईकांना दिल्लीला हलविण्यासंदर्भात हे पथक अंतिम निर्णय घेणार असल्याचेही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा -काँग्रेसमधील पक्ष नेतृत्वाच्या संघर्षाचा इतिहास, 'या'वेळी झाले होते वाद