केपे (गोवा) - राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला असून बाणावली बलात्काराच्या घटनेनंतर दक्षिण गोव्यातील केपेमध्ये एका आसामी तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गोव्यात महिला सुरक्षित आहेत कि नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
नेमकी काय आहे घटना?
बलात्कार प्रकरणी गोव्यात दोघांना अटक - केपे बलात्कार
दिल्ली येथील 32 वर्षीय शंभूसिंग नामक व्यक्तीने मूळ आसाम येथील एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून गोव्यात आणले होते. 26 जुलैला ही तरुणी गोव्यात पोहोचल्यावर शंभुसिंग ने तिच्यावर बलात्कार केला होता. त्यांनतर 28 जुलै तेथील सुधाकर नाईक या 63 वर्षीय व्यक्तीनेही या तरुणीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.

बलात्काराचा व्हिडीओ ही काढलाय
या अमानुष बलात्काराचा व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याची माहितीही पुढे आली असून, पीडित युवतीने या घटनेनंतर पोलीस कॅट्रोल रूमला फोन केल्यामुळे हे प्रकरण उजेडात आले आहे. दरम्यान याप्रकरणी बुधवारी रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.