पणजी -राज्यात मीटर न बसवणाऱ्या टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा वाहतूक मंत्री माविन गुदींन्हो यांनी केली होती. मात्र, टॅक्सी चालकांनी विरोध केल्यावर ते बॅकफूटवर आले आहेत. तसेच पंधरा दिवसांत मीटर बसविण्याची मुदतही त्यांनी दिली.
राज्यात सरकारने टॅक्सी चालकांना नुकतीच टॅक्सी भाड्यात वाढ करून दिली होती. परंतु ही भाडेवाढ देत असताना वाहतूक मंत्री माविन गुदींन्हो यांनी येत्या पंधरा दिवसांत मीटर बसविण्याची प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा टॅक्सी परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला होता. यावर राज्यातील टॅक्सी संघटनांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून गुदींन्हो यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती.
टॅक्सी चालक हेच खरे हिरो -
टॅक्सी चालकांबाबत केलेले वक्तव्य अंगाशी आल्यानंतर गुदींन्हो यांनी टॅक्सीचालक हेच खरे राज्यातील पर्यटनाचे हिरो आहेत. तसेच त्यांना मीटर बसविण्यासाठी सरकार पन्नास टक्के अनुदान देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने आपल्या वक्तव्याबाबद्दल सारवासारव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.