महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मिरामार किनाऱ्यावर शेकडो पर्यटकांच्या उपस्थितीत सरत्या वर्षाला निरोप - sea beach

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरातून पर्यटक देश-विदेशातून गोव्यात दाखल झाले असून नववर्षाच्या पूर्वसंध्येला सूर्यास्त बघण्याकरता समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची विशेष गर्दी होती.

goa
मिरामार समुद्र किनारा

By

Published : Jan 1, 2020, 8:36 AM IST

पणजी - नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. किनाऱ्यावरील वाळूवर बसून निळ्याशार समुद्रात गडप होणारा वर्षातील शेवटचा सूर्यास्त बघणे ही एक पर्वणीच असते. मंगळवारीही गोव्याच्या विविध समुद्र किनाऱ्यावर देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

मिरामार समुद्र किनारा

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी जगभरातून पर्यटक गोव्यात दाखल झालेत. सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त बघण्याच्या निमित्ताने पर्यटक मोठ्या प्रमाणात मिरामार किनाऱ्यावर समुद्र स्नानाचा आनंद घेत होते. मुले किनाऱ्यावरील वाळूत नक्षी काढण्यात मग्न होती. तर, काही मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यात व्यस्त असलेले दिसत होते. काहींचे डोळे सूर्यास्ताकडे लागलेले होते. एकंदरीत जो तो आपआपल्या परिने मावळत्या वर्षातील शेवटचा सूर्यास्त डोळ्यात साठविण्याचा प्रयत्न करत होते.

हेही वाचा - "गोव्यासारखा धार्मिक सलोखा कुठेच नाही तो तसाच पुढे नेऊया"

सूर्यास्त बघण्यासाठी दुपारपासूनच किनाऱ्यावर लोक येताना दिसत होते. त्यामुळे, किनारी जीवरक्षक सज्ज होते. तसेच वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस तत्पर दिसत होते.

हेही वाचा - 'म्हादई'साठी गोवा सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे - दिगंबर कामत

ABOUT THE AUTHOR

...view details