पणजी -काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये विरोधी पक्षनेते चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांचाही समावेश आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद रिकामे झाले आहे. नवा विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी ४ आमदारांची आवश्यकता आहे. तर काँग्रेसजवळ ५ आमदार आहेत. ज्यामधील ४ माजी मुख्यमंत्री आहेत.
गोवा विधानसभा अधिवेशन: तिसऱ्या दिवसाचे कामकाजही विरोधी पक्षनेत्या विना - Goa Opposition Leader
माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांची नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे अंतिम निर्णय घेण्यासाठी पाठवली आहेत. ज्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब होऊन नाव घोषीत केले जाईल, अशी माहिती गिरीश चोडणकर यांनी दिली.
विधानसभा अधिवेशन सुरू होऊन ३ दिवस झाले तरीही काँग्रेस आपला नेता का निवडू शकत नाही, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या विधीमंडळ सदस्यांमध्ये कोणताही वाद नाही. यामधील माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो, रवी नाईक आणि प्रतापसिंह राणे यांनी हे पद स्वीकारण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांची नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे अंतिम निर्णय घेण्यासाठी पाठवली आहेत. ज्यावर दिल्लीत शिक्कामोर्तब होऊन नाव घोषीत केले जाईल.
दरम्यान, नव्याने पक्ष उभारणीसाठी लवकरच प्रदेश समितीची बैठक घेतली जाईल. तसेच त्यानंतर चिंतन शिबीर घेतले जाईल, असेही चोडणकर यांनी सांगितले.