महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

फोंडा परिसरात चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक; 44 हजारांचा मुद्देमाल जप्त - गोवा पोलिस उपमहानिरीक्षक परमादित्य

मागील काही दिवसात फोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी सौरभ बोरकर (वर 20, रा. बोरी-फोंडा) याला आज अटक केली. त्याच्याकडून संगणक, सीपीयू, पेनड्राईव्ह असा सुमारे 44 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

परमादित्य, गोवा पोलिस उपमहानिरीक्षक

By

Published : Aug 28, 2019, 9:12 PM IST

पणजी - मागील काही दिवसात फोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी सौरभ बोरकर (वर 20 वर्षे, रा. बोरी-फोंडा) याला आज अटक केली. त्याच्याकडून संगणक, सीपीयू, पेनड्राईव्ह असा सुमारे 44 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

फोंडा परिसरात चोरी करणाऱ्या चोराला अटक; 44 हजारांचा मुद्देमाल जप्त
फोंडा येथील गोवा बागायतदार सहकारी संस्थेचे भांडार आणि बोरी येथील विवेकानंद विद्यालय या दोन ठिकाणी चोरी झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानुसार अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये दिसून आलेल्या चेहऱ्याचा शोध घेतल्यानंतर फोंडा पोलिसांनी सौरभला अटक केली. त्याच्याकडून चोरीचा माल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती गोवा पोलीस उपमहानिरीक्षक परमादित्य यांनी दिली. दरम्यान, सौरभ बोरकर याने अन्य दोन गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. त्याबाबत फोंडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details