पणजी - 'म्हादई' नदी वाचवण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेत थेट पंतप्रधानांची भेट घ्यावी. यावेळी आम्हाला बोलण्यास अथवा आमचे म्हणणे लेखी मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी आज केली आहे.
पणजीतील मगो पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ढवळीकर म्हणाले केंद्राने म्हादईचे पाणी वळवण्याबाबत दिलेल्या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडे गाव सरकार आपली बाजू मांडण्यात कमी पडले आहे, की गोव्याच्या मुख्यंत्र्याचंचे तिथे कोणी ऐकत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. सरकार म्हादई आईहून मोठी असल्याचे सांगते. मात्र, त्यादृष्टीने काम काहीच करत नसल्याचे दिसते. विरोधी पक्षानी याबाबत सरकाने श्वेतपत्रिका काढावी अशी एकमुखी मागणी केली होती. मात्र, सरकारने ती धूडकावून लावली . विद्यामान मुख्यमंत्री जेव्हा सभापती होते तेव्हा खरे बोलले होते. मात्र, आता ते कोणाच्या दबावाखाली बोलतात हे दिसत नाही. यामुळे गोवा सरकारने म्हादईवर श्वेतपत्रिका काढून १९७३ पासून यावर आतापर्यंत कोणी काय काय केले हो जनतेसमोर ठेवावे.