पणजी - काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि एक प्रवृत्ती आहेत. यांच्या विरोधात गोवा सुरक्षा मंचची झुंज आहे, असे वक्तव्य गोसुमंचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी मतदानानंतर व्यक्त केले. भाजपचे रणनितीकार म्हणून काम पाहणारे वेलिंगकर पहिल्यांदाच निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे आहेत.
काँग्रेस-भाजपची प्रवृत्ती म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू - सुभाष वेलिंगकर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी आज मतदान होत आहे. यासाठी चार पक्षांचे तर दोन अपक्ष उमेदवार आहेत. यातील गोसुमंचे उमेदवार सुभाष वेलिंगकर आणि भाजपचे उमेदवार सिद्धार्थ वेलिंगकर यांचीच नावे पणजी मतदारसंघामध्ये आहेत. यामधील वेलिंगकर यांनी सेंट्रल पणजी येथील 9 क्रमांकाच्या केंद्रावर मतदान केले.
मतदानानंतर बोलता वेलिंगकर म्हणाले, भाजप आणि काँग्रेस माझ्यासमोर आहेत. मात्र, दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. दोन्ही प्रतिस्पर्धी एकच आहेत. कोण कधी कुठल्या पक्षात असतो याचा कुणाला थांगपत्ता नसतो. ही एक प्रवृत्ती असून याविरोधात स्वच्छ राजकारणाची झूंज आहे.
पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले, वयाची 70 वर्षे पूर्ण केली. 1988 ते 2012 दरम्यान राजकीय रणनिती ठरविण्यात सक्रीय होतो. राजकारणात नव्हतो. मात्र, गोवा सुरक्षा मंचच्या आग्रहामुळे राजकारणात सक्रीय झालो. एक उमेदवार म्हणून जेव्हा प्रचाराच्या निमित्ताने फिरतो तेव्हा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेता येतात. पहिल्याच निवडणुकीत यशस्वी होण्याचे वातावरण बघून समाधान वाटते.