पणजी - संरक्षण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर श्रीपाद नाईक यांनी आज सकाळी पहिल्यांदाच वास्को येथील गोवा शिपयार्डला भेट दिली. त्यानंतर त्यांनी तेथील अधिकाऱ्याशी चर्चा करत येथे मंजूर झालेले मात्र पूर्णत्वास न गेलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला.
तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या काळात 2015 मध्ये गोवा शिपयार्डला 12 माईनस्वीपर्स ( minesweepers) बनविण्यासाठी 32 हजार कोटींचे काम मिळाले होते. यासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि भारतीय उद्योजक क्षेत्राने कोरियन शिप बिल्डिंग इंडस्ट्रीच्या सहकार्याने काम सुरु केले. 'माईन काऊंटर मेझर व्हेसल' प्रकल्पाच्या निमित्ताने एकत्रितपणे जहाज बांधणी व्यवसायात जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणण्याच संकल्प केला होता.