महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

INS 'Hansa' Diamond Jubilee : गोव्याच्या मुक्तीसंग्रामात नौदलाचे विशेष योगदान, राष्ट्रपतींकडून गौरवोद्गार - गोवा स्वातंत्र्य संग्राम

नौदल ही देशाची शान असून, राज्याच्या व राष्ट्राच्या सागरी सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी नौदलाचे कार्य महत्वपूर्ण आहे. गोवा स्वातंत्र्यसंग्रामात नौदलाने विशेष भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. ते आज गोवा येथे आयएनएस 'हंसा'च्या डायमंड जुबली वर्षांपूर्ती कार्यक्रमात बोलत होते.

Diamond Jubilee of INS 'Hansa
Diamond Jubilee of INS 'Hansa

By

Published : Sep 6, 2021, 3:39 PM IST

Updated : Sep 6, 2021, 5:33 PM IST

पणजी - नौदल ही देशाची शान असून, राज्याच्या व राष्ट्राच्या सागरी सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी नौदलाचे कार्य महत्वपूर्ण आहे. गोवा स्वातंत्र्यसंग्रामात नौदलाने विशेष भूमिका बजावली आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. ते आज गोवा येथे आयएनएस 'हंसा'च्या डायमंड जुबली वर्षांपूर्ती कार्यक्रमात बोलत होते.

भारतीय नौदलाच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशाचे राष्ट्रपती सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी राष्ट्रपतींनी नौदलाची मानवंदना स्वीकारली

राष्ट्रपती म्हणाले, गोव्याच्या स्वातंत्र संग्रामात नौदलाचे विशेष योगदान आहे. गोवा राज्याला स्वतंत्र होऊन 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. गोवा राज्याला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी तत्कालीन सरकारने नौदलाकडे मदत मागितली होती. तेव्हा नौदलाने विशेष मोहीम राबवत गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात विशेष योगदान दिले होते, असे राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले.

आयएनएस हंसाचा हीरक महोत्सवी कार्यक्रम

हे ही वाचा -1 नोव्हेंबरपासून 43 स्मार्टफोन्समध्ये चालणार नाही WhatsApp, तुमचा फोन कोणता?

नौदलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके -

यावेळी नौदल अधिकाऱ्यांनी नौदलाची ताकद दाखविण्यासाठी विशेष प्रात्यक्षिके दाखविली. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, खासदार व केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पंचायत मंत्री म्हाव्हीन गुडीन्हो तसेच राज्याचे अन्य मंत्री, नौदल अधिकारी उपस्थित होते.

हे ही वाचा -..तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, उत्सव नंतरही साजरे करू, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

आयएनएस हंसा विषयी संपूर्ण माहिती -

भारतीय नौदलाचे मुख्य एअर स्टेशन आयएनएस हंसा (INS Hansa) आज डायमंड जुबली वर्ष साजरे करत आहे. कोईमतूर मध्ये 1958 साली सी हॉक, अलिजे आणि वॅम्पायर एअरक्राफ्टबरोबर स्थापित द नेवल जेट फ्लाइटला पाच सप्टेंबर 1961 रोजी आयएनएस हंसा च्या रुपाने विकसित केले होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर डाबोलिम एअरफील्डला नौदलाने एप्रिल 1962 मध्ये आपल्या ताब्यात घेतले होते. आयएनएस हंसा जून 1964 मध्ये डाबोलिममध्ये ट्रान्सफर झाले.

केवळ काही विमानांबरोबर एक सामान्य हवाई स्टेशनच्या रुपाने कार्यान्वित केलेल्या आयएनएस हंसाने मागील सहा दशकात आपली ताकद व कौशल्य वाढवले आहे. आयएनएस हंसा सध्या जवळपास 40 हून अधिक एयरक्राफ्ट्सचे संचालन करते. हे एयरक्राफ्ट्स सरारी 5000 तासाहून अधिक वेळ प्रतिवर्ष उड्डाण करतात. हंसा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे नियंत्रण करते. वर्षभरात सराकरी 29 हजार विमाने उड्डाण करतात.

Last Updated : Sep 6, 2021, 5:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details