ठळक घडामोडी :
काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्दिन यांना २ लाख १ हजार ५६१ मते, तर भाजपचे नरेंद्र सावईकर यांना १ लाख ९१ हजार ८०६ मते
१२.४० pm -दक्षिण गोवा मतदारसंघात काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्दिन हे २०५९ मतांनी आघाडीवर आहेत. त्यांना ९७ हजार ४१७ मते पडली असून भाजप उमेदवार नरेंद्र सावईकर यांना ९५ हजार ३५८ मते मिळाली आहेत.
११. ३० am -काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्दिन हे ३६४२ मतांनी आघाडीवर आहेत.
९.४० am -पहिल्या फेरी अखेर काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्दिन यांना ३५ हजार ३७९ मते मिळाले असून भाजप खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांना २७ हजार ४८८ मते मिळाली आहेत. सार्दिन यांना ७८९१ मतांची आघाडी मिळाली आहे.
८.०० am -दक्षिण गोवा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात
७.३० am - गोव्यात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार असून उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्ट्राँगरुम उघडली आहे.
पणजी - दक्षिण गोवा मतदारसंघात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. येथे भाजप खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्दिन, आपचे एल्विस गोम्स आणि राज्यात युती करणाऱ्या शिवसेनेनेदेखील या निवडणुकीत राखी नाईक यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची झालेली पाहायला मिळाली. या मतदारसंघात एकूण ८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. आता या ठिकाणी कोण बाजी मारणार हे थोड्याच स्पष्ट होईल.
२०१४ ची परिस्थिती-
नरेंद्र सावईकर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक जिंकली. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अॅलेक्सो रेजिनाल्डो लॉरेन्को यांना ३२ हजार ३३० मते, म्हणजे ७.९६ टक्के मतांनी पराभूत केले. या निवडणुकीत सवाईकर यांना १ लाख ९८ हजार ७७६ मते मिळाली, जी एकूण मतदानाच्या ४८ टक्के होती. त्याचवेळी काँग्रेस पार्टीच्या लॉरेन्को यांना १ लाख ६६ हजार ४४६ मते मिळाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत याठिकाणी ७५.२७ टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात ५ लाख ४५ हजार ३३६ मतदारांपैकी ४ लाख १० हजार ४९५ मतदारांनी मतदान केले होते. २०१४ च्या निवडणुकीत या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या, २ लाख १४ हजार ३२९, तर पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९५ हजार १२८ होती.