पणजी (गोवा) -कॅलनगुट समुद्रकिनारी अर्धनग्न अवस्थेत गुरुवारी सिद्धी नाईक या १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन पोलिसांनी अहवाल सादर केला. या अहवालावर काँग्रेसने संशय व्यक्त करत शुक्रवारी कॅलनगुट पोलीस स्टेशनला घेराव घालत पोलिसांना याप्रकरणी जाब विचारला आहे.
- कॉंग्रेसचा आरोप -
ग्रीन पार्क येथून बुधवारी बेपत्ता झालेल्या सिद्धी नाईकचा मृतदेह गुरुवारी कॅलनगुट समुद्रकिनारी अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालानुसार सिद्धीचा मृत्यू हा समुद्रात बुडून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. मात्र, घटनास्थळी सिद्धीचा मृतदेह ज्या अवस्थेत मिळाला. त्यानुसार, तिच्यावर बलात्कार किंवा तत्सम घटना घडली असावी. या प्रकरणाची खरी माहिती पोलीस लपवित असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
- काँग्रेसने घातला पोलीस स्टेशनला घेराव -
सिद्धी नाईकच्या मृत्यूचा तपास कॅलनगुट पोलीस करत आहेत. मात्र घटनास्थळी सिद्धीचा मृतदेह अर्धनग्न आढळून आला होता. त्यातच घटनास्थळी तिचे कपडेही आढळून आले नाहीत. त्यामुळे मृत्यूचे गूढ वाढले आहे. त्यामुळे तिच्यावर बलात्कार किंवा खुनाचा प्रयत्न झाला असून राजकीय दबावापोटी पोलीस सत्यता लपवित असल्याचा आरोप काँग्रेसने केला असून शुक्रवारी कॅलनगुट पोलीस स्टेशनला घेराव घालत पोलिसांना या प्रकरणी जाब विचारला आहे.
- सिद्धीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू - पोलीस