पणजी (गोवा) - शिवसेनेने पणजी मतदारसंघातून आपला उमेदवार मागे घेतला असून त्यांनी अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना आपला पाठिंबा दर्शविला ( Shiv Sena support to Utpal Parrikar ) आहे.
हॉटेल मैरियट संजय राऊत आणि उत्पल पर्रीकर यांची भेट -
शिवसेनेने पणजी मतदारसंघातून आपला उमेदवार मागे घेतला असून त्यांनी अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. मोदी-शहा हे बलात्कारी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी देतात, मात्र शिवसेना नेहमीच सत्याच्या बाजूने उभी राहिली आणि शिवसेनेने दिलेला शब्द पाळला अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान संजय राऊत आणि उत्पल पर्रीकर यांची हॉटेल मैरियट येथे एक गुप्त बैठक देखील झाली. याविषयी राऊत यांना विचारले असता त्यांनी नो कॉमेंट असे सांगितले.
'हे गोव्याच्या राजकारणाचे शुद्धीकरणही' -