महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa Election : निवडून आल्यावर भाजपमध्ये न जाण्याची हमी दिल्यास उत्पल पर्रीकरांना शिवसेना पाठिंबा देणार - उदय सामंत - प्रचारासाठी उदय सामंत गोव्यात

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे हा विषय सध्या केंद्रस्थानी आहे. उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी निवडून आल्यावर भाजपात (BJP) न जाण्याचे आश्वासन दिले तर शिवसेना (Shivsena) त्यांना आपला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी सांगितले.

minister udAy samant
मंत्री उदय सामंत

By

Published : Jan 25, 2022, 6:51 PM IST

Updated : Jan 25, 2022, 10:00 PM IST

गोवा(पणजी) - पणजीतून अपक्ष निवडणूक लढवणारे मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी निवडून आल्यावर भाजपात (BJP) न जाण्याचे आश्वासन दिले तर शिवसेना (Shivsena) त्यांना आपला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी सांगितले. ते आज गोव्यात बोलत होते.

मंत्री उदय सामंत यांच्यासोबत साधलेला संवाद

आधीच शिवसेनेने पणजीत दिलाय उमेदवार -

मागच्या काही दिवसांपासून गोवा राज्याचे लक्ष पणजी मतदारसंघाकडे लागले आहे. उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे हा विषय सध्या केंद्रस्थानी आहे. पर्रीकर यांनी त्यानंतर अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना विविध पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्वच पक्षांनी पर्रीकर याना पाठिंबा द्यावा अशी विनंती केली होती. मात्र, ऐनवेळी शिवसेनेने पणजीतूनच शैलेंद्र वेलिंगकर यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे,

हेही वाचा -Goa Assembly Election : प्रचारासाठी महाराष्ट्र-कर्नाटकातून कार्यकर्ते गोव्यात दाखल

आज याविषयी शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांना 'ईटीव्ही भारत'ने विचारले असता, जर उत्पल पर्रीकर यांनी निवडून आल्यावर भाजपात प्रवेश न करण्याची हमी दिली तर शिवसेना त्यांना आपला पाठिंबा जाहीर करणार असल्याचे सामंत म्हणाले.

शिवसेना बेरोजगार आणि स्वयंरोजगार या विषयावर निवडणूक लढणार -

शिवसेना गोव्यात आगामी विधानसभा निवडणूक ही स्वयंरोजगार आणि बेरोजगारी या विषयावर लढणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले आहे. शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करून आपले अकरा उमेदवार घोषित केले आहेत.

हेही वाचा -Chitra Wagh on Goa Election : गोव्याचे लोक पुन्हा एकदा भाजपला संधी देणार - चित्रा वाघ

Last Updated : Jan 25, 2022, 10:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details