पणजी- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गोवा सरकार आवश्यक उपाययोजना करत आहे. तसेच 15 मार्चच्या मध्यरात्रीपासून 31 मार्च पर्यंत राज्यातील व्यामायशाळा, जलतरणतलाव, चित्रपटगृहे, कॅसिनो, स्पा, क्लब बंद ठेवण्यात येतील. अंगणवाडीपासून उच्च महाविद्यालये बंद राहतील. परंतु, ज्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्या परीक्षा वेळीच होतील, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी पणजीत केली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे उपस्थित होते.
रविवारी मध्यरात्रीपासून गोव्यात शाळा, चित्रपटगृहे, कँसिनो बंद हेही वाचा-येस बँकेच्या ग्राहकांना तात्पुरता दिलासा, १८ मार्चला हटणार निर्बंध
आल्तीने-पणजी येथे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विविध खात्यांचे अधिकारी आणि आरोग्य खात्याशी संबंधित उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी बैठकीतील निर्णयाची घोषणा केली. आरोग्य मंत्र्यांनी 1897 चा इपिडेमिक डिसीज कायदा लागू केल्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. आजच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. प्राथमिक स्तरावर तत्काळ थर्मलगन ऐवजी थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी विमानतळ, रेल्वे स्टेशन्स, मुरगाव बंदर अशा ठिकाणी गोवा सरकार उपलब्ध करुन देणार आहे. ज्यामुळे देशविदेशातील प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे सोपे होईल.
15 मार्च पासून शाळा बंद...
राज्यातील शाळा महाविद्यालयाये, जलतरणतलाव, व्यायामशाळा, चित्रपटगृहे, कॅसिनो, स्पा आणि क्लब आदींसासखी बंद दरवाजातील घडामोडींची ठिकाणे जेथे लोकांची गर्दी होते. ती 15 मार्चच्या मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत पुढील आदेशापर्यंतक्ष बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, शॉपिंग मॉल सुरू राहतील.
परीक्षा वेळापत्रकाप्रमाणेच होतील..
दहावी, बारावी आणि अन्य इयत्तांच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे होतील. केवळ परीक्षेदिवशीच शाळा उघडल्या जातील. सध्या शिमगोत्सव सुरू आहे. परंतु, तो स्थगित ठेवायचा की नाही? याचा निर्णय संबंधित समितीने घ्यायचा आहे. सरकार यासाठी कुणावर बळजबरी करणार नाही. राज्यात सध्या जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. याकाळात लोकांनी एकत्र येण्याचे टाळावे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आली आहे की, या पुढे कोणत्याही बैठकांना परवानगी देऊ नये. तसेच मतदानासाठी लोकांनी एकत्रित जाण्याऐवजी विभागून जावे. निवडणूक कर्मचाऱ्यांना मास्क पुरविण्यात येतील. तसेच मतदारांसाठी सॅनिटायझर ठेवण्यात येतील. याला लोक आणि राजकीय पक्षांनी सहकार्य करावे.
महिनाभरात व्हायरोलॉजी प्रयोगशाळा कार्यरत...
गोव्यातील रुग्णांचे नमुने पुणे, मुंबई येथे पाठवावे लागतात. त्यामुळे वेळेची बचत करण्यासाठी पुढील 30 दिवसांत गोवा सरकार व्हायरोलॉजी प्रयोगशाळा उभाराणार आहे. लोकांनी केंद्र आणि राज्य सरकार जारी करत असलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. तसेच अफवा पसरवू नये. एखाद्या विषयी संशय आल्यास अथवा मार्गदर्शनासाठी सरकारच्या '104' या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधवा. तसेच पर्यटकांनी सध्या गोव्यात येण्याचे टाळावे. तसेच गोव्यातून परदेशात जाण्याला बंदी घालण्यात आली आहे.
मास्कच्या किंमती वाढवू नये...
राज्यातील विविध धार्मिक संस्था आणि प्रमुखांनी लोकांच्या आरोग्याचा विचार करत लोक एकत्र जमा होणारे धार्मिक कार्यक्रम काही काळ थांबवावेत. तसेच कोणत्याही औषध विक्रेत्याने मास्कच्या किंमती वाढवू नये. साठेबाजी करू नये. तसे निदर्शनास आल्यास आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.