महाराष्ट्र

maharashtra

Goa Assembly Election 2022 : साखळीत विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत हॅटट्रिक साधणार?

By

Published : Jan 21, 2022, 4:24 PM IST

गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. उत्तर गोवा जिल्ह्यातील साकेलीन मतदारसंघांमध्ये विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या दोन निवडणुकांमध्ये विजय प्राप्त केला आहे. यंदाही सावंत साखळी मतदारसंघात आपल्या विजयाची पताका लावणार का याबाबत मतदारांमध्ये औत्सुक्याचं वातावरण आहे.

-sakhali-vidhan-sabha-constituency
-sakhali-vidhan-sabha-constituency

पणजी (गोवा) -गोवा विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) रणधुमाळी आता सुरु झाली आहे. १४ फेब्रुवारीला राज्यात निवडणूक होणार आहे. उमेदवारीसाठी २१ ते २७ जानेवारी या काळात अर्ज भरता येणार आहेत. राज्यात एकूण ११ लाख ५६ हजार ४६४ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये २२९५ नवमतदार असणार आहेत. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर गोवा जिल्ह्यातील साखळी मतदारसंघ (Sakhali Vidhan Sabha Constituency) हा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मतदारसंघ आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघातून प्रमोद सावंत यांनी सातत्याने विजय संपादन केला असून ते गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

साखळी मतदारसंघाची रचना -
उत्तर गोवा जिल्ह्यातील बिचोलीन तालुक्यात साखळी मतदारसंघ (Sakhali Vidhan Sabha Constituency) येतो. या मतदारसंघात कुडेम, अमोना, नावेलिम, पाले, सुरला आणि साकेलीन या गावांचा समावेश आहे. या मतदारसंघातील मतदारांची संख्या २६ हजार २०७ इतकी आहे. यापैकी १३०३३ पुरुष मतदारांची संख्या आहे तर १३१७४ महिला मतदारांची संख्या आहे. सरासरी ९० टक्के इतके मतदान होते.

२०१२ विधानसभा निवडणूक -
२०१२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रमोद सावंत यांनी काँग्रेसच्या प्रताप गौंस यांचा पराभव केला. प्रमोद सावंत यांना १४ हजार २५५ मते मिळाली. तर प्रताप गवस यांना सात हजार ३३७ मतांवर समाधान मानावे लागले. ही दोन उमेदवारांमध्ये थेट लढत झाली होती.

२०१७ विधानसभा निवडणूक -
२०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत साकेलीन मतदारसंघ पुन्हा एकदा डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांचा पराभव केला. प्रमोद सावंत यांना दहा हजार ५८ मते मिळाली तर काँग्रेसच्या धर्मेश सगलानी यांना सात हजार ९२७ मतांवर समाधान मानावे लागले. तिसऱ्या क्रमांकावर जीएसएमच्या उमेदवाराने तीन हजार ८३१ मते मिळवली.

यंदाच्या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत आपला गड कायम राखणार की त्यांना काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार हे लवकरच स्पष्ट होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details