पणजी - मांडवीतील कसिनो हटवण्यासाठी रायझिंग गोवन्सतर्फे २४ जून रोजी पणजीतील आझाद मैदानावर निदर्शने करण्यात येणार आहेत. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रायझिंग गोवन्सचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
मांडवीतील कँसिनो हटवा; २४ जूनला रायझिंग गोवन्स आझाद मैदानावर करणार निदर्शने
रायझिंग गोवन्सतर्फे २४ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदानावर निदर्शने करण्यात येणार आहे. त्यामध्ये अधिकाधिक गोमंतकियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रायझिंग गोवन्सतर्फे शैलेंद्र वेलिंगकर यांनी केले आहे.
पणजीचे आमदार बाबू मोन्सेरात यांनी कँसिनो हटविण्याचे दिलेल्या आश्वासन आणि पणजी महापालिकेने कसिनो अतिक्रमण हटविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक करावे लागेल. परंतु, २ दिवसांपूर्वी महिला काँग्रेसने केलेल्या आंदोलनाकडे पाहिले असता त्यांची मूळ मागणी ही कँसिनो हटवण्याऐवजी पणजीचे आमदार, महापौर यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलांविरोधात गुन्हे दाखल करण्याची आहे. त्यामुळे आंदोलनाविषयी संशयच येतो, असेही वेलिंगकर म्हणाले.
मांडवीतील कँसिनो हटविण्यासाठी सामाजिक चळवळीची गरज आहे. राजकारण्यांनी नेतृत्व करण्याऐवजी याचळवळीला पाठिंबा द्यावा. कारण यापूर्वीच अनुभव पाहता कसिनो हटविण्याऐवजी त्यांची संख्या वाढत गेली. यासाठी रायझिंग गोवन्सतर्फे २४ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदानावर निदर्शने करण्यात येणार आहे. त्यामध्ये अधिकाधिक गोमंतकियांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रायझिंग गोवन्सतर्फे शैलेंद्र वेलिंगकर यांनी केले आहे.