पणजी- गोवा विधानसभेचे सभापती म्हणून भाजपच्या राजेश पाटणेकर यांची आज निवड करण्यात आली. एकदिवसीय विशेष अधिवेशनात मांडण्यात आलेला ठराव त्यांनी २२ विरुद्ध १६ मतांनी जिंकला. मागील ४७ वर्षे सतत विधानसभा सभापती निवडणूक जिंकणाऱ्या काँग्रेसचा पहिल्यांदाच पराभव झाला आहे.
प्रभारी सभापती मायकल लोबो यांनी सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात करत प्रस्ताव वाचून दाखवले. सभापतीपदासाठी भाजपच्यावतीने राजेश पाटणेकर यांनी तर, काँग्रेसतर्फे प्रतापसिंह राणे यांनी उमेदवारी दाखल केली होती. निकालासाठी उभे राहुन समर्थन देण्याचे ठरल्यानंतर पाटणेकर यांना सत्ताधारी भाजप, घटकपक्ष गोवा फॉरवर्ड आणि ३ अपक्षांसह २२ आमदारांनी समर्थन दिले. तर, १६ आमदारांनी उभे राहून विरोध दर्शविला.