महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa Assmbly Election 2022 : गोव्यात राहुल गांधींच्या उपस्थितीने काँग्रेसमध्ये चैतन्य - राहुल गांधी गोवा निवडणूक 2022

गोवा विधानसभा निवडणुकीत ( Goa Election 2022 ) काँग्रेस पक्षाला यंदा संधी असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये भाजप सरकारच्या विरोधात जोरदार पवित्रा घेतल्यानंतर ते आज गोव्यात दाखल झाले. ( Congress Leader Rahul Gandhi Goa Rally ) त्यांचा तोच भाजप विरोधातला आवेश गोव्यातही कायम होता.

Rahul Gandhi
राहुल गांधीं

By

Published : Feb 4, 2022, 7:38 PM IST

Updated : Feb 5, 2022, 12:04 PM IST

पणजी (गोवा) -काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गोव्यात प्रचारात ( Congress Leader Rahul Gandhi Goa Rally ) भाग घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले आहे. ( Goa Election 2022 ) काँग्रेस पुन्हा एकदा नव्या ताकदीने या निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करील, असे मत गोव्यातील राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. ( Political Analyst on Goa Cogress Future in Election 2022 )

गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यंदा संधी असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये भाजप सरकारच्या विरोधात जोरदार पवित्रा घेतल्यानंतर ते आज गोव्यात दाखल झाले. त्यांचा तोच भाजप विरोधातला आवेश गोव्यातही कायम होता.

राहुल गांधी यांचा करिष्मा -

राहुल गांधी गोव्यात दाखल होताच गोव्यातील काँग्रेसजनांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसले. राहुल गांधी यांनी गोव्यात येताच भाजपचा कारभाराचे अतिशय जोरदारपणे वाभाडे काढले. त्यांच्या नेहमीच्या पद्धतीत काही मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेटी देत, सर्वसामान्य मतदारांशी अत्यंत साधेपणाने वागत त्यांनी मतदारांच्या भावनेला हात घातला. त्यामुळे काँग्रेसबाबत मतदारांच्या मनात असलेल्या सॉफ्ट कॉर्नरला अधिक बळकटी मिळाल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार अनिल लाड यांनी व्यक्त केले आहे. काहीही झाले तरी गोव्यातील पर्यावरणाचे आणि रोजगाराचे रक्षण करणार ही राहुल गांधींनी दिलेली साद महत्त्वाची ठरणार आहे, असेही लाड म्हणाले.

हेही वाचा -Rahul gandhi Goa Rally : गोव्यातील गरीबांना महिन्याला ६ हजार रुपये, राहुल गांधींची मोठी घोषणा

नव्या फळीचा काँग्रेसला फायदा -

काँग्रेसमधील दिग्गज नेते काँग्रेसला सोडून गेल्यानंतर, काँग्रेस पक्षातील नव्या दमाच्या उमेदवारांना गोव्यात संधी मिळाली आहे. या उमेदवारांचा अनुभव कमी असला तरी त्यांच्या समोरील उद्दिष्ट स्पष्ट आहे. पक्षात कोणत्याही पद्धतीचा गोंधळ शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच जोरदारपणे उतरली आहे. त्यात राहुल गांधी आल्यानंतर त्यांनी उमेदवारांकडून पक्ष सोडून जाणार नाही अशी प्रतिज्ञापत्रे लिहून घेतली आहेत. यामुळे उमेदवारां सोबतच मतदारांच्या मनातही विश्वास निर्माण झाला आहे. हाच विश्वास काँग्रेसला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो, असे मत किशोर नाईक गावकर यांनी व्यक्त केले आहे. गोव्यात असलेल्या आप आणि तृणमूल काँग्रेस किंवा काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांमुळे काँग्रेसचे नुकसान होईल आणि त्याचा फायदा भाजपाला होईल असे जरी चित्र रंगवले जात असले तरी त्यात तथ्य नाही. काँग्रेसला मिळणारी मते ही कापली जाणार नाहीत असा दावा किशोर नाईक करतात.

सरकार विरोधातली अँटी इन्कबन्सी अधिक तीव्र -

गेली दहा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपविरोधी अँटी इन्कबन्सी तयार झालेली आहे. राहुल गांधी आल्यानंतर या वातावरणाला अधिक जोर मिळालेला आहे. काँग्रेसच्या बाजूने वाढणाऱ्या जनमताला अधिक बळकटी मिळणार आहे, त्यामुळे राहुल गांधी यांचा हा दौरा काँग्रेसच्या पथ्यावर पडला आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय विश्लेषक राजन नाईक यांनी व्यक्त केली.

Last Updated : Feb 5, 2022, 12:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details