महाराष्ट्र

maharashtra

Prostitution Racket Exposed Goa : गोव्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; एका अभिनेत्रीसह ३ महिलांची सुटका

By

Published : Mar 20, 2022, 3:56 PM IST

गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेकडून सांगोल्डा (पर्वरी) येथे बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. ( Prostitution Racket Exposed Goa ) या प्रकरणातून मुंबईतील सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. ( Goa Police )

Prostitution Racket Exposed in Goa
गोव्यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

पणजी - गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेकडून सांगोल्डा (पर्वरी) येथे बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. ( Prostitution Racket Exposed Goa ) या प्रकरणातून मुंबईतील सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. ( Goa Police ) तर या पीडित महिलांना वूमन प्रोटेक्शन होम मध्ये ठेवण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुन्हा शाखेचे पथक उत्तर गोव्यात गस्तीवर होते. यावेळी एक दलाल वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हा शाखेचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल परब, निरीक्षक नारायण चिमुलकर, सहाय्यक महिला उपनिरीक्षक शीतल नाईक, हवालदार उमेश देसाई, इर्शाद वाटांगे, पोलीस कॉन्स्टेबल कल्पेश तोरस्कर, विनायक सावंत, स्वप्नील सिमेपुरुषकर आदींच्या पथकाने लगेच कारवाई सुरू केली.

दलाल वेश्या व्यवसायासाठी महिला पुरवत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. तो गुरुवारी सांगोल्डा येथील बेला विस्ता परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये संशयित येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजता पथकाने हॉटेलच्या आजूबाजूला सापळा रचला. त्यानंतर बनावट ग्राहकाद्वारे संशयीत दलाल हाफिज सय्यद बिलाल (२६, आंध्रप्रदेश ) याच्याशी संपर्क साधला. बनावट ग्राहकाने ५० हजार रुपये देऊन तीन महिलांची मागणी केली. ठरल्याप्रमाणे दलाल महिलांना घेऊन आला. लगेच पथकाने छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले.

हेही वाचा -Devendra Fadnavis on Shivsena : ही त्यांची मिलिजुली कुस्ती; एमआयएमच्या प्रस्तावावरुन देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर टीका

त्यानंतर गुन्हा शाखेचे निरीक्षक थॅरोन डिकॉस्टा यांनी दलाल हाफिझ सय्यद बिलाल याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७० (३), ३७० (ए) (२) आणि मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्याचे कलम ४, ५ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करून रीतसर अटक केली आहे. शुक्रवारी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयिताला सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details