महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

PM Goa Visit : गोवा मुक्तीदिनानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी एकदिवसीय गोव्याच्या दौऱ्यावर (PM Goa Visit) येत आहेत. 19 डिसेंबरला (19th December) गोव्याच्या मुक्तीसंग्रामला 60 वर्षे (60th anniversary of liberation) पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने राज्य सरकारने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान राज्यातील विविध लोकोपयोगी प्रकल्पांचा लोकार्पण करणार आहेत.

PM Goa Visit
PM Goa Visit

By

Published : Dec 18, 2021, 8:22 AM IST

Updated : Dec 18, 2021, 4:22 PM IST

पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 डिसेंबर रोजी गोव्याला (PM Goa Visit) भेट देतील आणि दुपारी 3 वाजता गोवा येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे गोवा मुक्ती दिनाच्या समारंभास (60th anniversary of liberation) उपस्थित राहतील. या कार्यक्रमात पंतप्रधान स्वातंत्र्यसैनिक आणि ‘ऑपरेशन विजय’मधील (Operation Vijay) योद्ध्यांचा सत्कार करतील. पोर्तुगीज राजवटीपासून गोवा मुक्त करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन विजय’च्या यशासाठी दरवर्षी 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो.

नरेंद्र मोदी गोव्याच्या दौऱ्यावर

विकासकामांचा लोकार्पण सोहळा

नूतनीकरण केलेले अग्वाद किल्ला कारागृह संग्राहलय, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी ब्लॉक, न्यू साऊथ गोवा जिल्हा रुग्णालय, मोपा विमानतळावरील हवाई कौशल्य विकास केंद्र (एव्हिएशन स्किल डेव्हलपमेंट सेंटर) आणि दाबोळी-न्हावेली, मुरगांव येथील गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन यासह अनेक विकास प्रकल्पांचे पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. गोवा येथील बार कौन्सिल ऑफ इंडिया ट्रस्टच्या इंडिया इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लीगल एज्युकेशन अँड रिसर्चचीही ते पायाभरणी करतील. सर्वोत्कृष्ट पंचायत/नगरपालिका, स्वयंपूर्ण मित्र आणि स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना पंतप्रधान पुरस्कारांचे वितरण करतील.

हुतात्म्यांना वाहणार श्रद्धांजली

पंतप्रधान आपल्या भेटीदरम्यान, दुपारी 2:15 वाजता, शहीद स्मारक, आझाद मैदान, पणजी येथे पुष्पहार अर्पण करतील. दुपारी अडीच वाजता ते मिरामार, पणजी येथे नौदलाची परेड आणि हवाई उड्डाण कवायतीला (फ्लाय पास्ट) उपस्थित राहतील.

या आधीचे मोदींचे गोवा दौरे

जून 2014

पंतप्रधान झाल्यावर प्रथमच नरेंद्र मोदी गोव्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी अरबी समुद्रात गोव्याच्या किनार्‍यावरील देशातील सर्वात मोठ्या युद्धनौके INS विक्रमादित्यला भेट दिली आणि भारताच्या नौदल पराक्रमाचे प्रदर्शन केले. त्यावेळी ते MIG 29 विमानातही बसले आणि गोव्याच्या किनार्‍यावरून निघालेल्या जहाजावरील लढाऊ लढाऊ विमानाचा अनुभव घेतला.

नोव्हेंबर 2016

2016 साली जागतिक ब्रिकस (briks) परिषदेत सहभागी होण्यासाठी नरेंद्र मोदी गोव्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी मोपा पठारावरील ग्रीनफिल्ड विमानतळ आणि उत्तर गोव्याच्या पेरनेम उप-जिल्ह्यातील तुएममधील इलेक्ट्रॉनिक शहर या दोन मोठ्या प्रकल्पाची पायाभरणी केली होती.

जानेवारी 2017

2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी पणजीत एक प्रचारसभेला जनतेला संबोधित केले होते.

मार्च 2019 लोकसभा निवडणूक

मार्च 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी चौथ्यांदा गोव्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सभा पणजीतील कंपाल मैदानावर घेतली होती.

हेही वाचा -Goa Assembly Congress List : निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच काँग्रेसच्या 8 उमेदवारांची यादी जाहीर

Last Updated : Dec 18, 2021, 4:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details