महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता

या काळात पावसासह विजेचा गडगडाट होणार असून वाऱ्याचा वेग ताशी 15 नॉटस् वेगाने वाहणार आहेत. दक्षिण गोव्यातील सांगे, धारबांदोडा आणि काणकोण तालुक्यातील काही ठिकाणी याचा प्रभाव अधिक जाणवणार आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Oct 14, 2019, 9:59 PM IST

पणजी- गोव्याच्या काही भागात पुढील तीन तासात विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे. दक्षिण आणि उत्तर गोव्यातील काही तुरळक भागात अधिक शक्यता असल्याचा अंदाज गोवा हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

क्षिण आणि उत्तर गोव्यातील काही तुरळक भागात अधिक शक्यता असल्याचा अंदाज गोव हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

या काळात पावसासह विजेचा गडगडाट होणार असून वाऱ्याचा वेग ताशी 15 नॉटस् वेगाने वाहणार आहेत. दक्षिण गोव्यातील सांगे, धारबांदोडा आणि काणकोण तालुक्यातील काही ठिकाणी याचा प्रभाव अधिक जाणवणार आहे. तर उत्तर गोव्यातील डिचोली आणि सत्तरी तालुक्यात विजेच्या गडगडाटाची शक्यता आहे. यावेळी वारे वायव्य दिशेने वाहणार आहेत.

हेही वाचा - मनसेचा उमेदवार 'चंपा'ची चंपी करणार - राज ठाकरे

मान्सून आता परतीच्या वाटेवर असल्याने प्रमाण कमी झाले तरीही रात्रीच्या वेळी काही ठिकाणी हजेरी लावत आहे. आज (सोमवारी) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत उत्तर गोव्यातील वाळपईमध्ये सर्वाधिक म्हणजे 004.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

हेही वाचा - शरद पवारांच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांनी दिले मजेशीर उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details