महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Goa CM Oath Ceremony : 'शपथविधी सोहळ्याबाबत उद्या निर्णय घेऊ'; काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती - गोवा मुख्यमंत्री शपथविधी समारोह

गोव्यातील नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत उद्या निर्णय ( Goa New CM Decision ) घेतला जाईल, अशी माहिती गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Pramod Sawant ) यांनी दिली आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत ( Bjp Won Goa Election 2022 ) भाजपला २० जागा मिळाल्या आहेत.

Goa Caretaker CM Pramod Sawant
Goa Caretaker CM Pramod Sawant

By

Published : Mar 20, 2022, 4:47 PM IST

Updated : Mar 20, 2022, 5:31 PM IST

पणजी - गोव्यातील नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याबाबत उद्या निर्णय ( Goa New CM Decision ) घेतला जाईल, अशी माहिती गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत ( Pramod Sawant ) यांनी दिली आहे. तसेच सोमवारी विधिमंडळ पक्ष नेता निवडीसंदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

काय म्हणाले प्रमोद सावंत?

भाजपाचे निरीक्षक सोमवारी गोव्यात येणार आहे. तसेच विधिमंडळ पक्ष नेता निवडीसंदर्भात बैठक घेण्यात येईल. तसेच शपथविधी सोहळ्यासंदर्भातही या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. याच संदर्भात ते काल दिल्लीलाही जाऊन आल्याचे ते म्हणाले.

यंदा गोव्यात भाजपाला 20 जाग -

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला २० जागा मिळाल्या आहेत. ( Bjp Won Goa Election 2022 ) सोबत ३ अपक्ष आमदार आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (एमजीपी) २ आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. अस्थिर गोव्यात भाजप पहिल्यांदाच मजबूत स्थितीत आहे.

हेही वाचा -Sanjay Raut on MIM Proposal : एमआयएमचा युतीचा प्रस्ताव म्हणजे मोठं कटकारस्थान - संजय राऊत

Last Updated : Mar 20, 2022, 5:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details