महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pramod Sawant as Goa CM : गोव्याची धुरा प्रमोद सावंतांच्या हाती; सलग दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ - प्रमोद सावंत दुसऱ्यांदा गोवा मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत हेच गोव्याचे पुढील मुख्यमंत्री (Pramod Sawant as Goa CM ) असतील हे आता स्पष्ट झाले आहे. सावंत यांना सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री पद (second term as Goa CM) सांभाळता येणार आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी सावंत यांच्या नावाची घोषणा केली आहे.

goa cm pramod sawant
मुख्यमंत्री पदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा

By

Published : Mar 21, 2022, 8:07 PM IST

पणजी - डॉ. प्रमोद सावंत हेच गोव्याचे पुढील मुख्यमंत्री (Pramod Sawant as Goa CM ) असतील हे आता स्पष्ट झाले आहे. सावंत यांना सलग दुसऱ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री पद (second term as Goa CM) सांभाळता येणार आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Union minister Narendra Singh Tomar) यांनी प्रमोद सावंत हेच पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. यावेळी भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे सर्व आमदार उपस्थित होते.

मुख्यमंत्री पदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावाची घोषणा करताना

पणजी प्रादेशिक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत केंद्रीय निरीक्षक नरेंद्र सिंग तोमर, एल मुरुगण, निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, सी टी रवी व पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते.

विश्वजीत राणे यांच्याकडून प्रमोद सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव -

मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरु असताना विश्वजीत राणे यांनीही आपली दावेदारी केल्याने पेच निर्माण झाला होता. त्यामुळे गोव्यात भाजपला सरकार स्थापन करण्यास उशीर झाला. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील भाजप हायकमांडने प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणेंशी दिल्लीत चर्चा केली. त्यानंतर आज अखेर सावंत यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महत्वाची म्हणजे विश्वजीत राणे यांनीच आज विधिमंडळ बैठकीत सावंत यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. तसेच तो एकमताने मंजूर करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले.

कोण आहेत डॉ. प्रमोद सावंत?

प्रमोद सावंत हे 2012 मध्ये पहिल्यांदा गोव्यातील साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या कोल्हापूरच्या 1997 च्या बॅचने सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी झाले आणि विधानसभेचे अध्यक्ष झाले. पुढे दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर प्रमोद सावंत यांची पहिल्यांदा 2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details