महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pramod Sawant Goa CM Charge : जाहीरनाम्याची वचनपूर्ती करणार; शपथविधीनंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत लागले कामाला

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant Oath) यांनी आपल्या पदाचा पुन्हा एकदा कार्यभार स्वीकारला (Pramod Sawant Goa CM charge) आहे. आज सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आठ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची प्रमुख उपस्थिती होती.

pramod sawant goa cm
गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By

Published : Mar 28, 2022, 8:28 PM IST

Updated : Mar 28, 2022, 9:10 PM IST

पणजी - शपथविधी संपन्न होताच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Goa CM Pramod Sawant Oath) यांनी आपल्या पदाचा पुन्हा एकदा कार्यभार स्वीकारला (Pramod Sawant Goa CM charge) आहे. आज सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आठ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची प्रमुख उपस्थिती होती. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेच प्रमोद सावंत कामाला लागले आहेत.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया

जाहीरनाम्यात दिलेल्या गोष्टी पूर्ण करणार : 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात ज्या गोष्टी समाविष्ट केल्या आहेत, त्यांची वचनपूर्ती करण्याचे काम करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. राज्याला पर्यटन क्षेत्रात अग्रेसर करणे, खाणी सुरू करणे, मत्स्य व्यवसायला चालना देणे, गोव्याला प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण करणे या गोष्टींना आपण प्राधान्य देणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

प्रमोद सावंत दुसऱ्यांदा बनले गोव्याचे मुख्यमंत्री : गोव्याचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. गोव्याचे ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोव्याचे निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस, प्रभारी सी. टी. रवी यांच्यासह भाजपशासित नऊ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.

Last Updated : Mar 28, 2022, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details