पणजी -कोणताही धर्म ग्रंथ नेहमीच दुसऱ्या धर्माचा आदर करवा, अशीच शिकवण देतो. त्यामुळे कोणता भेदाभेद न करता पुढे गेले पाहिजे. त्याबरोबर मनुष्य कोणत्याही धर्माचा असो, विकासासाठी त्याला शिक्षणाची गरज आहे. तेथे मुलगा-मुलगी असा भेद न करता द्यावे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज साखळी येथे केले.
उत्तर गोव्यातील डिचोली तालुक्यातील वसंतनगर साखळी येथे रझा-ए-मुस्तफा असोसिएशनचच्यावतीने ' जश्ने मिलाद उल नबी' ( इद ए मिलाद) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. यावेळी मुख्यमंत्री सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष दाऊद खान, नगरसेवक यशवंत म्हाडकर, सुनील साळुंखे, रियाज पाठण आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की आपण कोणत्या धर्मात जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसते. जन्मानंतर धर्म पाळला जातो. परंतु, कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा आदर करावा अशीच शिकवण देत असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता पुढे जात रहावे. अयोध्या विषय वादाचे कारण ठरत होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निवाडा दिला आहे. ज्यामुळे वादाचे कराण असलेला विषय निकाली निघाला आहे. त्यामुळे आता भविष्यात धर्मावरून कोठेच भांडणे होणार नाहीत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोवा हे सर्वधर्मसमभाव राखणारे राज्य आहे. येथे सर्वधर्मियांनी समान हक्क दिले जातात, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, व्यक्ती कोणत्याही धर्मातील असो, प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. तसेच ते मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव न करता दिले गेले जावे. भवितव्य घडविण्याची मुलांएवढेच कौशल्य प्रशिक्षण मुलीला देणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री म्हणून गोव्यात धार्मिक अल्पसंख्याकांना आर्थिक मागस या निकषावर आरक्षण देण्यात यशस्वी ठरलो. ज्याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांना झाला. धार्मिक अल्पसंख्यांक लोकांनी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत सावंत म्हणाले, सरकार म्हणून सर्वसमाज घटकांना पुढे घेऊन जाणे ही जबाबदारी आहे. त्यामुळे गोव्याच्या प्रगतीसाठी एकमेकांवर विश्वास ठेवावा. या वेळी असोसिएशनच्यावतीने लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.