महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात पुन्हा पावसाची शक्यता, 'फनी'चा परिणाम जाणवणार नाही - राजेंद्र एम

गोव्यात 'फनी' वादळाचा परिणाम जाणवणार नाही, असा अंदाज पणजीतील प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

संग्रहित छायाचित्र

By

Published : Apr 29, 2019, 9:11 PM IST

Updated : Apr 30, 2019, 7:06 PM IST

पणजी - गोव्यात पुढील २ दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, 'फनी' वादळाचा काहीच परिणाम होणार नाही, असा अंदाज पणजीतील प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे.

हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ माहिती देताना

आज सकाळी गोव्याच्या काही भागात पावसाने तुरळक स्वरूपात हजेरी लावली. यामध्ये राजधानी पणजीत २ मिलीमीटर तर दक्षिण गोव्यातील काणकोण येथे सर्वाधिक १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुढील २ दिवस तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेंद्र एम. यांनी दिली.

राजेंद्र एम. म्हणाले, पश्चिम बंगालच्या उपसागरात 'फनी' वादळ सदृश्य स्थितीमुळे केरळ, पश्चिम बंगाल आणि भारतीय बेटांवरील लोकांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली आहे. मात्र, ते चेन्नई समुद्र किनाऱ्यापासून पासून सुमारे ८०० ते ९०० किलोमीटर दूर आहे. याचा गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागावर परिणाम जाणवणार नाही. त्यामुळे मच्छीमारांना कोणत्याही विशेष सूचना देण्यात आलेल्या नाहीत. मात्र, तशी स्थिती आढळल्यास तत्काळ ईमेलद्वारे मच्छीमारांना सूचित केले जाईल.

Last Updated : Apr 30, 2019, 7:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details