महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तृणमूलची प्रादेशिक पक्षाशी पडद्याआड; चर्चा राज्यातील बडे नेते ममतांच्या भेटीला - etv bharat live

ममतांच्या गोवा भेटीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. आमदार रोहन खवटे, सुदिन ढवळीकर, चर्चिल आलेमाव या बड्या राजकीय नेत्यांनी ममता बॅनर्जींची भेट घेऊन पुढील राजकीय आघाडीची तयारी सुरू केली आहे.

mamta goa tour
ममता दीदींचा गोवा दौरा

By

Published : Oct 29, 2021, 10:51 PM IST

पणजी - राज्यात तिसऱ्या आघाडीच्या चाचपणीसाठी राज्यातील बड्या नेत्यांनी ममता बॅनर्जींची सदिच्छा भेट घेतली. गुरूवारी गोव्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सकाळी स्थानिक मच्छिमार बांधवांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या. तसेच संध्याकाळी गोव्यातील विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन आपण हिंदू असल्याचा नारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

राज्यातील बडे नेते ममतांच्या भेटीला
गोव्याची कला आणि संस्कृती जोपासण्यासाठी मैदानात
गोव्याची कला संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी तृणमूल काँग्रेस प्रयत्न करणार असून राज्यात फूट पडेल असे वर्तन आम्ही कधीच करणार नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगत आमच्या येण्याने काहींच्या हृदयात धडपड वाढली असून त्यांनी आमच्या स्वागतालाच काळे झेंडे दाखवले. मात्र, गोव्यातील जनताच त्यांना काळ्या यादीत टाकेल असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
गोव्यात हिंदुत्वाचा नारा
दिल्लीची दादागिरी गोव्यात खपवून घेतली जाणार नाही. भाजपला २०२४ मध्ये सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी आपण जात धर्म बाजूला ठेवून काम करणार आहे. मात्र, मी हिंदूच आहे, आणि गोव्यातही हिंदुत्वाचा नारा देणार असून मी जय श्रीराम न म्हणता जय गोमंतक म्हणणार असल्याचे ममतांनी सांगितले. आज (शुक्रवारी) त्यांनी हिंदुत्वाचा नारा देत राज्यातील मंगेशी, महालासा आणि तपोभूमी कुंडई येथे भेट दिली.
गोवा ही मातृभूमी
पश्चिम बंगाल हे अतिशय प्रभावशाली राज्य आहे. बंगालात फुटबॉल, मासे-भात, संगीत या प्रमुख गोष्टी आहेत. त्याच गोष्टी गोव्यातही सारख्याच आहेत. म्हणून बंगालप्रमाणे गोव्यातही आपल्याला नवी पहाट घडविण्यासाठी यायचे आहे. मी भारतीय आहे, मी कोठेही जाऊ शकते जर बंगालप्रमाणेच गोवाही माझीच मातृभूमी आहे. मी धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवते, माझा एकात्मतेवर विश्वास आहे म्हणून आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवतो.
ममता दीदींचा गोवा दौरा
आमचा लोकशाहीवर विश्वास आहे
आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. मात्र, भाजपा निवडणुकीत दंगे घडवून आणते. दिल्लीतील दादागिरी गोव्यात खपवून घेतली जाणार नाही. एवढी वर्ष पर्यटन, खाणी बंद करून भाजपने गोव्यातील युवकांना बेरोजगार केले. आम्ही सत्तेत आल्यावर पर्यटनाला उभारी देणार. खाणी सुरू करण्यासाठी नवी पॉलिसी आणणार असल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details