महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग, प्रादेशिक पक्षांची तृणमुलशी युती - political developments rapidly increase in Goa

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्डने तृणमूल काँग्रेसशी युतीची तयारी केल्यावर अचानक मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिल्ली दौरा करत पक्षश्रेष्ठींशी भेट घेऊन त्यांच्याशी निवडणूक विषयक चर्चा केली.

goa latest news
goa latest news

By

Published : Oct 23, 2021, 10:34 AM IST

Updated : Nov 1, 2021, 5:34 PM IST

पणजी - राज्यात २०२२ ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसशी युतीची शक्यता मावळल्यानंतर राज्यातील प्रादेशिक पक्षाने ममतांच्या तृणमुल सोबत जाऊन एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 ऑक्टोबरला ममता बॅनर्जी गोव्यात दाखल होणार आहेत. त्यांनतर या युतीवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

गोव्यात राजकीय घडामोडींना वेग

मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा -

राज्यात सर्वांचीच युतीकडे नजर लागून राहिली होती. प्रादेशिक पक्षानी ममतांच्या नवी सकाळला साथ देण्याचे ठरविल्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, संघटन मंत्री सतीश धोंड यांच्यासमवेत दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते व राज्य निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. या भेटीत राज्यातील निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील पाच आमदार तृणमूल सोबत -

महाराष्ट्र गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर, गोवा फॉरवर्ड विजय सरदेसाई यांनी आपल्या दोन सहकारी आमदार व अपक्ष आमदार रोहन खवटे यांना सोबत घेऊन तृणमुल सोबत राज्यात युती करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे निवडणूक प्रभारी पी चिदंबरम व दिनेश गुंडू राव यांनी युतीबाबत असमर्थता दर्शविल्याने या प्रादेशिक पक्षांनी अखेर तृणमुल सोबत जाण्याच्या हा निर्णय घेतला जाण्याचे बोलले जाते आहे.

ममता बॅनर्जी २८ ऑक्टोबरला गोव्याच्या दौऱ्यावर -

तृणमूलने अवघ्या महिनाभरापूर्वी राज्याच्या राजकारणात प्रवेश करत अनेक बड्या नेत्याना आपल्या पक्षात घेण्याचा सिलसिला चालूच ठेवला. त्यात प्रामुख्याने काँग्रेस पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. त्यात प्रादेशिक पक्षांनी युती केल्यास तृणमूलचे पारडे राज्यात नक्कीच जड होणार आहे. या सर्व राजकीय घडामोडी पाहता आणि युतीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी ममता बॅनर्जी २८ ऑक्टोबरला राज्यात दाखल होणार आहे.

हेही वाचा -पोकळ हिंद्त्वावरुन शिवसेनेची भाजपवर फटकेबाजी, सामनाच्या अग्रलेखातून डागले बाण

Last Updated : Nov 1, 2021, 5:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details