पणजी- गोव्याची राजधानी पणजीतील शिस्तबद्ध पार्किंगसाठी जानेवारी महिन्यापासून ' पे पार्किंग' सुरू करणार असल्याची माहिती पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली. तसेच वाढत्या कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी विविध ठिकाणी कमी क्षमतेचे कचरा व्यवस्थापनाचे प्रयत्न करणार असल्याचे मडकईकर यांनी सांगितले.
हेही वाचा -कुलदीप सेंगर दोषी ठरल्याने भाजपचा खरा चेहरा समोर आला- आमदार मनीषा कायंदे
पालिकेतील आपल्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मडकईकर म्हणाले, पे पार्किंगसाठी निविदा काढण्यात आली असून डिसेंबरअखेर पात्र कंपनीशी करार करण्यात येऊन जानेवारीपासून शहरात ' पे पार्किंग' योजना राबवण्यात येणार आहे. तसेच शहरातील काही भागात उभारण्यात आलेल्या वाहतूक व्यवस्थेप्रमाणे 'डिजिटल' पे पार्किंग प्रायोगिक तत्वावर सुरू केले जाणार आहे. उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी नुकताच पालिकेच्यावतीने दौरा करण्यात आला होता.