पणजी - केंद्रीय आयुष मंत्रालय आणि असोचेम चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया यांनी संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या आरोग्य मेळाव्याला आजपासून पणजीत सुरुवात झाली. केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
पणजीत तीन दिवसीय आरोग्य मेळाव्याला थाटात सुरुवात
केंद्रीय आयुष मंत्रालय आणि असोचेम चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडिया यांनी संयुक्तरीत्या आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन श्रीपाद नाईक यांच्याहस्ते झाले.
मिरामार येथील यूथ हॉस्टेल परिसरात हा तीन दिवसांचा आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बोलताना नाईक म्हणाले, गोवा हे जागतिक पर्यटन स्थळाबरोबर योगाभ्यासाठी आता याला पसंती मिळत आहे. हे ओळखून राज्य सरकारने योगा आणि नॅचरोपॅथीसाठी रुग्णालयाच्या उभारणी करता जागा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्याची निविदा काढून बांधकामाला सुरुवात झाली आहे. पुढील दीड वर्षात ही रूग्णालये लोकांच्या सेवेत असतील. यामध्ये उपचारांबरोबरच संशोधन केले जाणार आहे. आयुष सेवा लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आमचे काम सुरू आहे, असे सांगून नाईक म्हणाले, लोकांना या उपचार पद्धती विषयी माहिती व्हावी यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे गोमंतकीय मोठ्या प्रमाणात भेट देऊन माहिती घेतील. आज जगातील 14 देशांबरोबर या संबंधात सामंजस्य करार करण्यात आले आहे. 58 देशांत माहिती केंद्र उभारण्यात आली आहेत. 14 विद्यापीठांमध्ये यावर अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या शिबिरात आयुर्वेदिक औषधे, माहिती केंद्राचे स्टॉल आहेत. विविध औषधी वनस्पती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.