पणजी -पणजी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १९ मे रोजी घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यासाठी २२ ते २९ एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. ३० मे'ला छाननी तर २ मे हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. तसेच २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
पणजी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक १९ मे'ला - पणजी विधानसभा मतदारसंघ
पोटनिवडणुकीत इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे १७ मार्चला निधन झाले होते. त्यामुळे पणजी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे.
पोटनिवडणुकीत इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट वापरण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे १७ मार्चला निधन झाले होते. त्यामुळे पणजी विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. तत्पूर्वी, विधानसभेच्या मांद्रे, शिरोडा आणि म्हापसा या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे गोव्यातील विधानसभा पोटनिवडणूक मतदारसंघांची संख्या ४ झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाबरोबरच ही निवडणूक होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात गोव्यातील लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे.