पणजी : स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’ (Amrit Mohotsav) आणि ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियाना अंतर्गत भारतीय तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालय, 11 युनिटने आज सायकल रॅली (Organized cycle rally by Indian Coast Guard) काढली. डिआयजी अरुणाभ बोस यांनी रॅलीला झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. मुख्यालयापासून वारका समुद्र किनाऱ्यापर्यंत निघालेल्या रॅलीत अधिकारी आणि संरक्षण दलातील कर्मचारी असे एकुण 75 जण सहभागी झाले होते.
सायकल रॅलीच्या मार्गावर सायकलपटूंनी स्थानिकांना ‘हर घर तिरंगा’ मोहिमेविषयी सांगत, 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरावर तिरंगा फडकावण्याविषयी माहिती दिली. तसेच स्थानिक मच्छीमार समुदायाला समुद्रात मासेमारीदरम्यान घ्यावयाची सुरक्षितता, सागरी परिसर स्वच्छतेचे आणि वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले आणि प्लास्टीकचा वापर टाळण्याचे आवाहन केले.