महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 27, 2020, 5:32 PM IST

Updated : Feb 27, 2020, 6:26 PM IST

ETV Bharat / city

गोवा सरकारने 'म्हादई'वर श्वेतपत्रिका काढावी - दिगंबर कामत

म्हादई नदी प्रश्नी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी दिगंबर कामत यांनी केली आहे. या बाबत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी ही मागणी फेटाल्यानंतर कामत यांनी याबाबत ट्विट केले आहे.

opposition-leader-digambar-kamat-demanded-government-remove-the-white-paper-on-question-of-the-river-mhadei
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत

पणजी -'म्हादई' प्रश्नाचे 'दूध का दूध पानी का पानी हो जाए' यासाठी गोवा सरकारने श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी ही मागणी फेटाळल्यानंतर कामत यानी याबाबत ट्विट केले आहे.

हेही वाचा - हा तर गोव्यासाठी 'काळा दिवस' - दिगंबर कामत

कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवण्यास सुरुवात केल्यामुळे गोव्यात यापूर्वीच जलप्रवाह आटायला सुरुवात झाली आहे. जर यावर सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत, तर भविष्यात दुष्काळ पडण्याची भीतीही कामत यांनी व्यक्त केली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी म्हादई मुद्द्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. गोव्याची जीवनरेखा असलेल्या म्हादईच्या मुद्द्यावर सरकार कोणालाही विश्वासात घेण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे सरकारने विधानसभेचे एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे. ज्यामुळे विविध मुद्दे आणि सध्यस्थिती समोर येऊन चर्चा होईल. मात्र, मुख्यमंत्री आमची मागणी मान्य करण्यास तयार नाहीत. सर्व विरोधी पक्षांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकत्रितपणे यावर स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सरकारने त्याला परवानगी दिली नाही, असा आरोप कामत यांनी केला. सरकार या मुद्द्याचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात आहे. सरकारने या मुद्द्यावर राजकारण न करता सद्यस्थिती जनतेसमोर ठेवावी. यासाठी संबंधित विषयातील तज्ञ आणि सर्व संबंधित यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे.

हेही वाचा - 'माजी विद्यार्थ्यांच्या निधीतून दरवर्षी तीनशे विद्यार्थ्यांना बक्षीस'

Last Updated : Feb 27, 2020, 6:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details