महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nana Patole in Goa : गोव्याचा विकास फक्त काँग्रेसच करू शकते - नाना पटोले

काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी गोव्यात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole in Goa ) दाखल झाले. यावेळी गोव्याचा विकास काँग्रेसशिवाय दुसरे कोणीच करू शकत नाही, असे त्यांनी म्हटलं.

Nana Patole in Goa
नाना पटोले

By

Published : Feb 2, 2022, 4:16 PM IST

पणजी -गोवा विधानसभा निवडणुकीचे राजकारण ( Goa Assembly Election 2022 ) तापले आहे. सत्तेत येण्यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी गोव्यात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole in Goa ) दाखल झाले. यावेळी गोव्याचा विकास काँग्रेसशिवाय दुसरे कोणीच करू शकत नाही, असे त्यांनी म्हटलं.

गोव्याचा विकास केवळ काँग्रेसच करू शकते, हे लोकांच्या लक्षात आले आहे. काँग्रेस ही निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकेल. भाजपाने मनोहर पर्रीकर यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले आहे. हे त्यांच्या 'वापरा आणि फेका' धोरणाचे उदाहरण आहे, असे नाना म्हणाले.

आज मी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार केला. भाजपाने या भागातील खाणकाम बंद केले आहे. स्वतःला श्रीमंत आणि लोकांना गरीब केल्याने ते त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक हरत आहेत, असेही नाना पटोले म्हणाले.

गोवा विधानसभा निवडणूक -

राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी 2022 साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी एकाच टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर 10 मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.

हेही वाचा -Union Budget 2022 : आम्ही भाजपसारखा निवडणुकांवर लक्ष ठेवून अर्थसंकल्प सादर करत नाही - किशोरी पेडणेकर

ABOUT THE AUTHOR

...view details