पणजी - नुकत्याच सोलो इंडोनेशिया (Solo Indonesia) येथे झालेल्या एशियन ज्युनिअर ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याच्या नितीश बेलुरकरने कांस्यपदक पटकावले आहे. स्पर्धेच्या 7 फेऱ्यांमध्ये नितीशने 5 गुण प्राप्त केले होते.
नितीश बेलुरकरने इंडोनेशियातील बुद्धिबळ स्पर्धेत पटाकावले कांस्य - Solo Indonesia
बेलुरकरने अंतिम फेरीच्या सामन्यात व्हिएतनामच्या इंटरनँशनल मास्टर गुयेन अंखोई (Nguyen Ankhoi) चा पराभव केला.
बेलुरकरने अंतिम फेरीच्या सामन्यात व्हिएतनामच्या इंटरनँशनल मास्टर गुयेन अंखोई (Nguyen Ankhoi) चा पराभव केला. तर फिलिपाईन्सचा इंटरनॅशनल मास्टर क्वेझॉन डॅनिएल सुवर्ण पदक विजेता ठरला. या स्पर्धेत खुल्या गटात भारतीय बुद्धिबळपटूंनी 3 पदके मिळवली. तर मुलींच्या गटाने 4 पदकांची कमाई केली.
नितीशने मिळविलेल्या या यशाबद्दल गोवा बुद्धिबळ संघटना अध्यक्ष नीलेश काब्राल, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार किशोर बांदेकर आणि तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटना यांनी अभिनंदन केले आहे.