पणजी - जगभरातील गोमंतकीयांना समाज माध्यमातून जोडण्याबरोबरच त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी गोवा एनआयआय आयुक्तालयाने स्वतःचे ट्विटर हँडल सुरू केले आहे. ते जगभरात वेगाने संपर्क साधण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिसाद गोव्याचे एनआयआर आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी केले.
एनआयआय आयुक्तालयाने सुरू केले स्वतःचे ट्विटर हँडल
पर्वरीतील सचिवालयातील कार्यालयात सावईकर यांनी ट्विटर हँडलचे अनावरण केले. यावेळी सचिव संजयकुमार आणि संचालक अँथनी डिसोझा उपस्थित होते.
हेही वाचा-'आता ‘मातोश्री’ वरुन आदेश येत नाही, तर दिल्लीतील मातोश्रींचे आदेश ऐकावे लागतात'
पर्वरीतील सचिवालयातील कार्यालयात सावईकर यांनी ट्विटर हँडलचे अनावरण केले. यावेळी सचिव संजयकुमार आणि संचालक अँथनी डिसोझा उपस्थित होते. यावेळी सावईकर म्हणाले की, जगभरातील गोमंतकीयांना आपल्या समस्या मांडण्यासाठी हे चांगले माध्यम आहे. ज्यामुळे वेगाने संपर्क करणे सोपे होईल. एन आर आय आयुक्तालयाकडून खलाशांसाठी दर महिना अडीच हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून याची अमंलबजावणी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी प्राप्त अर्जांची छाननी करुनच वेतन दिले जाणार आहे. तसेच एखादा लाभधारक दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेतचा लाभ घेत असेल तर त्यामध्ये 500 रुपये एनआरआय विभाग भर घालेल. अशाप्रकारे निवृत्ती वेतनाचे सुमारे 2 हजार 400 लाभधारक आहेत.