महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rahul gandhi Goa Rally : गोव्यातील गरीबांना महिन्याला ६ हजार रुपये, राहुल गांधींचे आश्वासन - nyay yojana scheme goa

गोवा राज्यासाठी नवीन न्याय योजना सुरू करण्यात येणार आहे. ( 'Nyay Scheme' will be launched Goa ) या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरिबांना महिन्याला 6 हजार रुपये देण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी ( Gongress leader Rahul Gandhi ) यांनी दिली.

rahul gandhi
राहुल गांधी

By

Published : Feb 4, 2022, 6:45 PM IST

Updated : Feb 4, 2022, 8:56 PM IST

पणजी (गोवा) -आम्ही ऐतिहासिक निर्णय घेत आहोत. गोवा राज्यासाठी नवीन 'न्याय योजना' सुरू करण्यात येणार आहे. ( 'Nyay Scheme' will be launched Goa ) या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरिबांना महिन्याला 6 हजार रुपये देण्यात येणार आहे. याप्रमाणे वर्षाला 72 हजार रुपये त्यांच्या खात्यात आपोआप जमा होणार आहेत, अशी माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी ( Gongress leader Rahul Gandhi ) यांनी दिली.

काँग्रेस नेते राहुल गांधी

गोव्यातील काँग्रेसचे सरकार जनतेचे असणार -

काँग्रेस नेते राहुल गांधी आज शुक्रवारी गोव्यात दाखल झाल्यानंतर त्यांनी आज गोव्यातील विविध भागात जाऊन प्रचार केला. संध्याकाळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात जाऊन सभा घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीत थेट लढत भाजपा आणि काँग्रेस पक्षात होणार आहे. लोकांच्या हाती भवितव्य असून तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा, असे सांगत त्यांनी जनतेला गोव्यात काँग्रेस सरकार बनल्यास ते जनतेचे सरकार होणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा -Goa Assmbly Election 2022 : गोव्यात राहुल गांधींच्या उपस्थितीने काँग्रेसमध्ये चैतन्य

राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -

  1. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास ते जनतेचे सरकार असणार आणि प्रत्येक निर्णय लोकांना विचारून घेतले जाणार आहेत
  2. कोल हबमुळे गोव्याचे पर्यटन नष्ट होणार त्यामुळे कोल हब रद्द करण्यात येणार आहे
  3. समाजातील प्रत्येक घटक, व्यावसायिक, छोटे व्यवसाय करणाऱ्या लोकांशी चर्चा करून निर्णय घेतले जाणार आहेत
  4. देशात दोन भारत निर्माण झाले पहिला धनदांडग्या व्यावसायिक व दुसरा भारत हा करोडो गरिबांचा भारत आहे, ज्यात हजारो लोकांना आपल्या हक्कासाठी भांडावे लागत आहे
  5. नोटबंदी आणि जीएसटीमुळे लोकांचा वाटोळे झाले. यात गरीब भरडला गेला आणि श्रीमंत आणखी श्रीमंत झालेत
  6. राज्यात होणाऱ्या कोलहबमुळे अदानी सारख्या व्यावसायिकांचे भले होणार
  7. गोव्यात गरिबांसाठी न्याय योजना, प्रत्येक गरिबाला 6 हजार रुपये थेट खात्यात जमा केले जाणार, यामुळे राज्यातील गरिबी हटली जाणार
  8. गोव्यात नवीन व्यवसाय उभारले जाणार
Last Updated : Feb 4, 2022, 8:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details